राष्ट्रवादीच्या मोर्चात बैलगाडी, सायकल

कोपरगाव : येथील राष्ट्रवादीच्या मोर्चात बैलगाड्याही आणण्यात आल्या होत्या.

पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे केंद्र, राज्य शासनाचा नोंदविला निषेध : महिलांच्या हाती निषेधाचे फलक

कोपरगाव  – केंद्र, राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढवून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्याच्या आरोप करत या दरवाढीच्या विरोधात सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोपरगावात मोर्चा काढला होता. मोटारसायकल बैलगाडीत ठेवण्यात आली. सायकलला मोटारसायकल बांधून ढकलत मोर्चा काढण्यात आला.

युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आले.  शासनाच्या निषेधाचे फलक हातात घेऊन आणि निषेध फलकाचे कपडे अंगावर घालून कार्यकर्ते मोटारसायकली हाताने ढकलत होते. फसव्या भाजप सेना सरकार आहे, असे फलक लावून सरकारची अंत्ययात्रा काढण्यात आली होती.

मोर्चामध्ये युवतींसह महिलांचा सामावेश होता. गॅसदर वाढीचा निषेध महिलांनी सरकारविरोधी घोषणा देत केला. हा मोर्चा डॉ. आंबेडकर पुतळा, विघ्नेश्‍वर चैक, गुरुद्वारा रस्ता मार्गे तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. शासनाने पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ करून सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. शेजारच्या पाकिस्तान सरकाने तोटा सहन करून इंधन दर कमी केले. राज्य सरकारने इतर राज्यांपेक्षा 10 ते 12 रूपये वाढीव दराने इंधन विक्री करीत आहे.

महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी वारंवार इंधन दरवाढ करून पैसे गोळा करण्याचे काम सरकार करीत आहे. हे सरकार खाली खेचण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस वेळोवळी आंदोलने करणार असल्याचे वर्पे म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष सुनील गंगुले, चारूदत्त सिनगर, माधवराव खिलारी, ऍड. मनोज कडू, अशोक आव्हाटे, योगेश नरोडे, रमेश गवळी, प्रतीभा शिलेदार, चंद्रभागा हिंगे आदींनी भाषणातून भाजप सरकारचा निषेध केला. नायब तहसीलदार शिवाजी सुसरे यांना आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)