हिंमत असेल तर आधी तुमच्या १६ मंत्र्यांच्या भ्रष्टाचारची चौकशी करा -धनंजय मुंडे

बीड – परळी येथे रविवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेसची संयुक्त सभा तसेच निर्धार_परिवर्तनाचा यात्रेची समारोप सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनजंय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, विवाह सोहळ्यानिमित्त काल मुख्यमंत्री परळीत आले होते. नवदाम्पत्यांना आशीर्वाद द्यायला आलेत असा माझा समज होता, मात्र त्यांनी त्या कार्यक्रमातही राष्ट्रवादीवर टीका केली. परिवर्तन यात्रेने त्यांच्या काळजात कळ आणली आहे. लक्षात ठेवा, या मस्तवाल सत्तेच्या समारोपाची सुरुवात परळीतूनच होईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुढे बोलताना धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. धनंजय मुंडे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत आमचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. आमच्या नेत्याला धमकी देण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा. आमच्या वाट्याला जाऊ नका, जशास तसे उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे. हिंमत असेल तर आधी तुमच्या १६ मंत्र्यांच्या भ्रष्टाचारची चौकशी करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)