काळजी घ्यावी, महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय – जितेंद्र आव्हाड

मुंबई – नगरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. त्यामुळे रणजितसिंह मोहितेही भाजपात प्रवेश करणार का, याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

या राजकीय वर्तुळातील घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यात लहान मुलं पळवणारी टोळी सक्रीय झाली आहे, काँग्रेस-राष्ट्रवादीतील  पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी असा टोला भाजपाला लगावला आहे.

“महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी ! जनहितार्थ जारी..” असं ट्विट आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर केलं आहे.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1105382005548699648

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)