राष्ट्रवादी ही भष्ट्राचार मॅनेजमेंट कंपनी ; मुख्यमंत्र्यांची राष्ट्रीवादीवर कणखर टीका

कोल्हापूर:भाजपा-शिवसेना-रिपाईच्या संयुक्त प्रचाराचा सर्व नेत्यांनी एकत्रित फोडला नारळ आज कोल्हापुरात फोडले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली. देश चालविण्यासाठी ५६ पक्ष नाही, ५६ इंचाची छाती लागते. नावात राष्ट्रवादी शब्द घालून राष्ट्रवादी होत नाही. राष्ट्रवाद हा मनात असावा लागतो,असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ऊसासंदर्भात जितके निर्णय साखर सम्राटांच्या काळात घेतले गेले नाही, तितके निर्णय मोदीजींनी घेतले. हे विदर्भातील लोक पश्चिम महाराष्ट्राचे नुकसान करतील, असा अपप्रचार केला गेला, पण आज आकडेवारीसह विकास सिद्ध होतो आहे. गरीब कल्याणाच्या योजना खऱ्या अर्थाने आता राबविण्यात आल्या. जनधन, प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला, शेतकरी सन्मान निधी, स्वच्छ भारत अशा कितीतरी योजनांनी विकास साधला आहे.

काँग्रेसवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, राष्ट्रवादी ही भष्ट्राचार मॅनेजमेंट कंपनी आहे. सेनेच्या पराक्रमावर केवळ दोनच लोक पुरावे मागतात. एक पाकिस्तान आणि दुसरी काँग्रेस, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)