समृद्धीपेक्षा बेकारीचा महामार्ग लांबलचक – राष्ट्रवादी काँग्रेस

पुणे – बेरोजगारीच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सरकारविरूध्द चांगलीच आक्रमक होताना दिसत आहे. तसेच सध्याच्या सरकारला या मुद्यावरून घेरण्याचा प्रयत्नही राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरात बेरोजगारीविरोधात आंदोलन छेडण्यात येत आहे त्याबरोबरच सोशल माध्यमाव्दारेही सरकारवर टीका करण्यात येत आहे.

वाढती बेरोजगारी, बेकारी यांची तुलना राष्ट्रवादीने समृध्दीमहामार्गांशी केली आहे. राष्ट्रवादीने समृध्दीपेक्षा बेकारीचा महामार्ग लांबलचक असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात बेरोजगारीविरोधात आंदोलन छेडले असून त्याची सुरुवात मुंबईतील प्रदेश कार्यालयापासून केली आहे. मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा नेण्यात आला.

देशातील रोजगाराविषयी प्रसिध्द झालेली आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. बेरोजगारीचा हा दर गेल्या ४५ वर्षात सर्वाधिक असल्याचा दावा राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाकडून (NSSO’s) करण्यात आलाय. बेरोजगारीचा हा सर्वाधिक दर मोदी (भाजप ) सरकारच्या सत्ताकाळात आहे, असं राष्ट्रवादीने म्हटले आहे. तसेच याबदल केंद्र सरकारला जाॅब दो आणि जबाब दो अस म्हणतं उत्तर मागितले आहे.

https://twitter.com/NCPspeaks/status/1095163084539232256

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)