नांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार

पुणे – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष यांच्या महाआघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती काँग्रसने आपल्या अधिकृत ट्विटरवर  दिली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्या महाआघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा बुधवार दि.२० फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये इंदिरा गांधी मैदानावर सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी (कवाडे), शेकाप, आरपीआय(गवई गट)  यांच्यासह महाआघाडीतील घटकपक्षांचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.  महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येंनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)