सोशल माध्यमांवर ‘राष्ट्रवादी-भाजपा’मध्ये जुंपली

पुणे – गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना-भाजपामध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या नाट्यानंतर अखेर शिवसेना आणि भाजपामध्ये काल मुंबई येथे युतीवर शिक्कामोर्तब झाले. यानंतर विरोधीपक्षातून युतीवर सातत्याने टीका होत आहे.

‘सेनेचा बाण कमळाबाईच्या हृदयी रुतला
निवडणुका जवळ येताच युतीचा प्रश्न सुटला!’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अशी कविता करत सोशल माध्यमाव्दारे युतीवरून राष्ट्रवादीने भाजप-शिवसेना वर कवितेव्दारे टीका केली होती.

त्यानंतर भाजपानेही त्याच स्टाईलमध्ये राष्ट्रवादीला उत्तर दिले आहे. भाजपाने राष्ट्रवादीच्या टीकेला उत्तर देताना म्हटले आहे की, “महाराष्ट्राला लावला १५ वर्षे चुना आणि म्हणे राष्ट्रवादी पुन्हा !”

दरम्यान, सोशल माध्यमावर सध्या राजकीय पक्षामध्ये जुंपली असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असले तरी येणाऱ्या आगामी निवडणूकीत कोण जिंकणार आणि हरणार हे मात्र जनताच ठरवणार हे मात्र नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)