सीएसएमटी पूल दुर्घटना : अजित पवारांची ‘शिवसेना-भाजपा’वर जोरदार टीका

मुंबई – मुख्यमंत्र्यांना म्हणे आघाडीच्या डोळ्यातलं पाणी दिसतंय,पण देवेंद्र फडणवीसजी तुम्हाला तुमच्या मित्रपक्षाच्या हलगर्जीपणामुळे आलेलं सामान्य मुंबईकरांच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही का..? असा सवाल अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. तसेच ‘मुंबईकरांना वाऱ्यावर टाकून प्रचार करणं’ हा भाजपा-शिवसेनेच्या असंवेदनशीलतेचा कळसच आहे, असं म्हणत त्यांनी युतीवर टीका केली आहे.

-Ads-

दरम्यान, काल मुबंईतील सीएसएमटी स्टेशनजवळ काल संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई महापालिकेचा पूल कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू तर 31 जण जखमी झाले. मुंबई पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे, त्यामुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दुर्घटनेतील जखमींची विचारपूस करायला हवी होती. मात्र उध्दव ठाकरे हे जखमींची विचारपूस न करता प्रचारासाठी अमरावतीला रवाना झाले.

त्यामुळे उध्दव ठाकरे यांना प्रचाराचीच चिंता असून मुंबईकरांचा विसर पडला आहे का, त्यांनी मुंबईकरांना वाऱ्यावर सोडले आहे का? अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत आहे. त्याबरोबरच उध्दव ठाकरे यांच्यावर विरोधी पक्षाकडूनही जोरदार टीका होताना पहायला मिळत आहे.

मुंबईकर वाऱ्यावर; उध्दव ठाकरे प्रचारासाठी अमरावती दौऱ्यावर

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)