जिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो ? राष्ट्रवादीची मोदींवर टीका

पुणे – जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये ४० जवानांना आपला प्राण गमवावे लागले होते. पुलवामा हल्ल्यामुळे सध्या देशभर संतापाची लाट असून सतत भारताच्या कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानप्रती मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष खदखदत असल्याने पाकिस्तानला आता त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देण्याची गरज असल्याची भावना देशवासियांमध्ये आहे.

दरम्यान, पुलवामा येथे राखीव सुरक्षा दलाच्या काफिल्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्यावरून जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यासह अनेक नेत्यांनी सीमा सुरक्षा दलाचा एवढा मोठा काफिला गेल्या काही काळापासून अशांत असलेल्या काश्मिरात प्रवेश करत असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ते प्रतिबंधात्मक उपाय केले गेले नसल्याची खंत बोलून दाखवली आहे. विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी, गुप्तचर विभागाकडून सरकारला असा हल्ला होण्याची संभावना असल्याची माहिती पुरवण्यात आली होती मात्र सरकारने या माहितीकडे कानाडोळा केला असा दावा करण्यात आला आहे मात्र सरकारने हे दावे फेटाळले आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीने याबाबत एक व्यंगचित्र आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट पोस्ट करत म्हटले आहे की, “जिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो..? देशाचे चौकीदार म्हणवता आणि सुरक्षा यंत्रणेकडे अक्षम्य दुर्लक्ष करता?” असा सवाल राष्ट्रवादीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

https://twitter.com/NCPspeaks/status/1097459336710930433

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)