‘शिवसेना-राष्ट्रवादी’त वाक्‌युद्ध जुंपले

पिंपरी – मावळ लोकसभा मतदार संघातील पार्श पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चेवरुन शिवसेना-राष्ट्रवादीत जोरदार वाक्‌युद्ध जुंपले आहे. महापालिकेतील चुकीच्या कामांबाबत मूग गिळून गप्प बसणारे दत्ता साने हे विरोधी पक्षनेते नव्हे तर सत्ताधारी भाजपचे खरेदी नेते आहेत, अशी जहरी टीका शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर यांनी शनिवारी (दि. 12) केली. तसेच पार्थ पवार हे अजित पवार यांचे पुत्र आहेत. त्यांचे स्वतःचे कर्तृत्व काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी, कोण पार्थ पवार, तो तर केवळ पोस्टर बॉय आहे, असे वक्तव्य केले होते. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विरोधी पक्षनेता दत्ता साने यांनी प्रत्युत्तर दिले. खासदार बारणे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामुळे स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. आगामी निवडणुकीत बारणे यांचे “डिपॉझिट’ लोकसभेत राहणार नाही असे वक्तव्य केले. त्याला शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे.

योगेश बाबर म्हणाले, दत्ता साने यांचे वक्तव्य बालिशपणाचे आहे. त्यांची राजकीय अपरिपक्वता त्यांच्या पत्रक बाजीतून दिसून येते. खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी स्वत: या बाबत प्रतिक्रिया दिली नाही. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आपले मत मांडत असताना. कोण पार्थ पवार, पार्थ पवारची ओळख केवळ अजितदादांचे पुत्र एवढीच आहे. त्याचे सामाजिक काम काय आहे. आप्पा बारणे गेली पंचवीस वर्षे या शहरामध्ये राजकीय व सामाजिक काम करत असून नगरसेवक ते खासदार अशी त्यांची ओळख आहे. महापालिकेच्या पाच निवडणुका, विधानसभा, लोकसभा आशा निवडणुका लढवलेले खासदार आप्पा बारणे लोकसभेमध्ये सर्वाधिक प्रश्न मांडणारा खासदार म्हणून त्यांची ओळख आहे.

ते काय “डिपॉझिट’ जप्त करणार?

मतदार संघामध्ये देखील सर्वाधिक संपर्क ठेवणारा खासदार म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. दत्ता साने यांना खासदार आप्पा बारणे यांची व शहराची राजकीय पार्श्वभूमी माहिती नाही. ते त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. स्थायी समितीचे अध्यक्षपद हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार असलेले शाम वाल्हेकर यांच्या विरोधात निवडणूक लढवून बारणे यांनी राष्ट्रवादीचा पराभव करून मिळवले आहे. 42 दिवस चाललेल्या या निवडणुकांचा इतिहास पिंपरी-चिंचवड शहरवासियांना माहिती आहे.

साने यांनी 2014 लोकसभा निवडणुकांची पार्श्वभूमी जाणून घ्यावी. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार राहुल नार्वेकर यांचे “डिपॉझिट’ खासदार आप्पा बारणे यांनी जप्त केले होते. जे आपल्या उमेदवाराचे “डिपॉझिट’ वाचवू शकत नाहीत ते दुसऱ्याचे “डिपॉझिट’ जप्त करण्याची भाषा करतात हा एक विनोदाचा भाग म्हणावा लागेल, असे योगेश बाबर यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)