छत्तीसगड मधील चकमकीत नक्षलवादी ठार

राजनांदगाव: छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यात झालेल्या चकमकीत मंगळावारी एक महिला नक्षलवादी ठार झाल्याची घटना घडली आहे. गतापार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मध्यप्रदेश सीमेवरील जंगलात ही चकमक घडली. या महिलेचे बाकीचे साथीादर पळून गेले. जवानांनी या परिसराची छाननी केली असता त्यांना तेथे एक मशिनगन आणि अन्य सामग्री आढळून आली.

सोमवारी रात्री नक्षलवाद्यांनी याच राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला होता तर अन्य सहा जण जखमी झाले होते. छत्तीसगड राज्यात तीन टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार असल्याने त्या भागात सध्या नक्षलवाद्यांच्या हालचालींवर कसून लक्ष ठेवले जात आहे. राज्याच्या सीमेवरून होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जादा यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)