नक्षलीं बदलणार रणनीती आणि ड्रेसकोड-गुप्तचरांची माहिती 

नवी दिल्ली – नक्षली आपली रणनीती आणि ड्रेसकोड बदलण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचरांनी दिली आहे. सुरक्षा दलांच्या कारवायांपासून बचाव करण्यासाठे हे बदल करण्यात येत आहेत. आजवर नक्षली सुरक्षा दलांच्या ड्रेसशी मिळताजुळता हिरव्या रंगाचा ड्रेस वापरत होते.

छत्तीसगड, ओडिशा, आणि झारखंडमध्येही नक्षली सीआरपीएफ (सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स) च्या ड्रेसशी मिळ्ताजुळ्ता ड्रेस, शूज आणि कॅप्स वापरताना आढळत होते, असे ड्रेस बाजारात कोठेही सहजपणे उपलब्ध होत असत. मात्र आता असा ड्रेस न वापरण्याचे आदेश नक्षल्यांनी आपल्या अनुयायांना दिले आहेत. मिलिटरी कमांडमधील नक्षली वगळता बाकी सर्व नक्षली यापुढे सिव्हिल कोड म्हणजे सर्वसामान्य लोकांसारखाच पोशाख करणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यांमुळे गावांत फिरताना ते सामान्य जनतेत सहजपणे मिसळून जातील आणि सुरक्षा दलांना त्यांना शोधणे वा निशाणा बनवणे सहजशक्‍य होणार नाही. हिंसक कारवाया करणाऱ्या नक्षलींसाठीही सिव्हिल ड्रेस कोडचा आदेश देण्यात आलेला आहे. ही बाब सुरक्षा दलांसाठी हानिकारक होणार आहे. गुप्तचर विभागाची ही माहोती सुरक्षा दलांना देऊन त्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)