छत्तीसगड-ओडिशा सीमेवर नक्षलींनी एक प्रवासी बस जाळली

सुकमा (छत्तीसगड) :छत्तीसगड -ओडिशा सीमेवर नक्षलींनी एक प्रवासी बस जाळली आहे. काल रात्री 9 वाजता ही घटना घडल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यातील मंथली पोलीस ठाणे क्षेत्रात नक्षलींनी एक प्रवासी बस अडवली. सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवले आणि बस अग्नीला अर्पण केली.

मिळालेल्या माहितीनुसार बस जाळण्यासाठी 20 ते 25 हत्यारबंद नक्षली आले होते. त्यांनी बसमधील प्रवासी आणि ड्रायव्हरला बंदुकीच्या धाकाने धमकावून बसमधून खाली उतरवले आणि बस जाळून टाकली. दोनच दिवसांनी, म्हणजे 31 जानेवारीला नक्षलींनी भारत बंद चे आवाहन केले आहे. त्या दृष्टीने लोकांमध्ये भय निर्माण करण्यासाठी नक्षलींनी ही कारवाई केली असावी असे सांगण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)