दंतेवाड्यात पुन्हा नक्षली हल्ला; एक जवान शहीद, 3 नागरिक ठार

दंतेवाडा – विधानसभा निवडणुकांपूर्वी छत्तीसगढमध्ये पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंगस्फोटाद्वारे सुरक्षा दलाच्या जवानांची बस उडवली आहे. या स्फोटात एक जवान शहीद आणि 3 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जवान या घटनेत जखमी झाले आहेत. नक्षलवादविरोधी अभियानाचे डीजी डीएम अवस्थी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, छत्तीसगडमध्ये विधानसभा निडवणुकांचे बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ९ नोव्हेंबर रोजी बस्तर संभागमध्ये दौरा करणार आहेत. त्याआधीच नक्षलवाद्यांनी दंतेवाडा येथे हल्ला घडवून आणला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)