नवाझ शरीफ यांची प्रकृती खालावली

लाहोर – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची प्रकृती खालावली असल्याचे पाकिस्तानमधील वर्तमानपत्रांनी म्हटले आहे. शरीफ यांच्या कुटुंबीयांनी रविवारी कोट लखपत तुरुंगात जाऊन शरीफ यांची भेट घेतल्यावर त्यांच्या प्रकृतीविषयीची ताजी माहिती समोर अली आहे. शरीफ हे किडनीच्या विकाराने आजारी आहेत.

शरीफ यांच्या कन्या मरियम नवाझ यांनी ट्विट करून आपल्या वडिलांच्या प्रकृतीविषयीची माहिती दिली आहे. शरीफ यांचा किडनीचा विकार तिसऱ्या टप्प्यामध्ये पोहोचला आहे. कालच रक्‍ताच्य चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातूनच किडनीचे काम व्यवस्थित होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. शरीफ यांच्या हातातही वेदना होत आहेत, असे मरियम यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. शरीफ यांचे वैयक्तिक फिजीशियन आदनान खान यांनी पूर्वपरवानगीने तुरुंगात शरीफ यांची तपासणी केली होती, असे स्थानिक वर्तमानपत्राने म्हटले आहे.

मरियम या जेंव्हा कोट लखपत तुरुंगात आल्या तेंव्हा पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ गट)चे कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी मरियम यांच्या नावाने घोषणाबाजी केली. या कार्यकर्त्यांनी जवळच्या रस्त्यावरची वाहतुक रोखण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

नवाझ शरीफ गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापासून तुरुंगात आहेत. त्यांना अल अझिझिया स्टील मिल्समधील भ्रष्टाचार प्रकरणी 7 वर्षांची शिक्षा सुनाव्ण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)