तीनदा पंतप्रधान बनलेले नवाज तुरुंगात, दहशतवादी मात्र मुक्त-बिलावल भुत्तो

इस्लामाबाद – दि. 14-तीन वेळा निवडून आलेले देशाचे पंतप्रधान तुरुंगात कैद आहेत आणि दहशतवादी मात्र हल्ले करण्यासाठी मोकळे फिरत आहेत, अशा शब्दात बिलावल भुुत्तो यांनी इम्रान खान सरकारवर कडाडून टीका केली आहे. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे पुत्र बिलावल भुत्तो सिंध विधानसभेत पत्रकारांशी संवाद साधत होते. ते एक ज्येष्ठ विरोधी नेते असून पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)चे अध्यक्ष आहेत.

पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक ए इन्साफ पक्षाच्या मंत्रिमंडळातील किमान तीन मंत्र्यांचे प्रतिबंधित दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत आणि कोणी या दहशतवादी संघटनांच्या विरुद्ध बोलले, तर जणू देशाच्या विरोधात बोलत असल्याचे हे मंत्री मानतात, असा आरोपही बिलावल भुत्तो यांनी केला आहे. जर इम्रान खान सरकारने त्यांच्या विरोधात कारवाई केली नाही, तर नाइलाजाने आपल्याला त्यांची नावे जाहीर करावी लागतील असा इशारा बिलावल भुत्तो यांनी दिला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)