वाढदिवशीच नवाज शरीफ कोट लखपत तुरुंगात रवाना

लाहोर (पाकिस्तान): पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची त्यांच्या वाढदिवशीच कोट लखपत तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. मंगळवारी त्यांचा वाढदिवस होता. त्याच्या अगोदर एक दिवस त्यांना अल-अजिजीया भ्रष्टाचार प्रकरणात 7 वर्षांची शिक्षा सुनवण्यात आली.

नवाज शरीफ यांना अगोदर रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात पाठवण्यात आले होते. मात्र आपले कुटुंबीय आणि डॉक्‍टर लाहोरमध्ये असल्यामुळे आपल्याला लाहोर तुरुंगात ठेवण्यात यावे यासाठी नवाज शरीफ यांनी अपील केले होते. त्यानुसार त्यांना लाहोर तुरुंगात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोट लखपत तुरुंगात त्यांच्यासाठी एक गादी, एक टेबल आणि दोन खुर्च्या, टीव्ही, आणि रोजची वर्तमानपत्रे यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवाज शरीफ कुटुंबीयावर भ्रष्टाचाराची तीन प्रकरणे आहेत. लंडनमधील चार आलिशान फ्लॅटबाबत उत्पन्नापेक्षा अधिक संपती प्रकरणात त्यांना 11 वर्षांची शिक्षा झालेली आहे. आता अजीजिया स्टील मिल प्रकरणात सात वर्षांची शिक्षा झाली आहे.

आपण निर्दोष असल्याचा दावा नवाज शरीफ यांनी केला आहे. या निकालाला इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे नवाज शरीफ यांच्या वकिलांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)