श्री अंबाबाईची ब्राह्मी रूपात पूजा 

(छाया - सतेज औंधकर, कोल्हापूर)
कोल्हापूर – शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज श्री अंबाबाईची ब्राह्मी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. दरम्यान, आज पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली. ब्राह्मी म्हणजेच ब्रम्हदेवाची शक्ती किंवा स्त्रीरूप. सप्तमातृकांपैकी एक. मत्स्यपुराण, महाभारत, देवीमहात्म्यामध्ये या देवीचा उल्लेख येतो.
मत्स्यपुराणानुसार शिवाने अंधकासुराच्या नाशासाठी मातृकांची निर्मिती केली. त्यातील ब्राह्मी ही एक मातृका. देवीमहात्म्यानुसार महासरस्वती अथवा कौशिकीच्या मदतीला शुंभ-निशुंभांच्या विरोधात ज्या मातृका निर्माण झाल्या. त्यात ब्राह्मीचा उल्लेख येतो, असे या पुजेचे महात्म्य आहे. ही पूजा श्री पूजक सचिन गोटखिंडीकर, अनिल गोटखिंडीकर, अमोल गोटखिंडीकर यांनी बांधली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)