नवरात्रीनिमित्त चासनळी येथे विविध धार्मिक कार्यक्रम

कोपरगाव – तालुक्‍यातील चासनळी येथे नवरात्रोत्सवानिमीत्त 10 ते 19 ऑक्‍टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.प. बाबूराव महाराज चांदगुडे यांनी केले आहे.

नवरात्रोत्सव काळात पहाटे चार वाजता काकडा, दुर्गा सप्तशती ग्रंथाचे सामुदायिक पारायण (6 ते 8) प्रवचन (5 ते 6) हरिपाठ (सायंकाळी 6 ते 7) कीर्तन (रात्री 9 ते 11) आदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

ह.भ.प. कैलास महाराज राजगुरू (दि. 10), शांताराम महाराज गाडेकर (दि. 11), भरत महाराज चांदगुडे (दि.12), श्रीराम महाराज गाडेकर (दि. 13), मीराबाई वाकचौरे (दि. 14), कल्याण महाराज पवार (दि. 15), बाबुराव महाराज चांदगुडे (दि. 16), बबन महाराज गव्हाणे (दि. 17), दिलीप महाराज डहाळे (दि. 18) यांची कीर्तने होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)