‘त्या’ वक्तव्यावरून नवजोत सिंग सिद्धू अडचणीत ?

पाटणा –  माजी क्रिकेटपटू तथा काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी कटिहार लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम मतदारांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यासाठी मोदींविरोधात एकगठ्ठा मतदान करण्याचे आवाहन आज केले होते. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने नवजोत सिंग सिद्धू यांना नोटीस बजावली आहे.

कटिहार लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम मतदारांना संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मतदान करण्याचा सल्ला नवजोत सिंग सिद्धू यांनी दिला होता. मुस्लिम मतदारांना  “तुम्ही अल्पसंख्यांक आहेत असा विचार करण्याची गरज नाही, कारण तुमची कटिहार लोकसभा मतदारसंघामधील संख्या ६२% आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी मोदींविरोधात एकगठ्ठा मतदान करून त्यांना पाडायला हवे.” असे नवजोत सिंग सिद्धू बोलताना म्हणाले होते.  त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते देवेश कुमार यांनी नवजोत सिंग सिद्धू यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आज निवडणूक आयोगाने नवजोत सिंग सिद्धू यांना नोटीस पाठवत २४ तासात उत्तर देण्यास सांगितले आहे.

https://twitter.com/ANI/status/1119622574521180160

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)