इंदूर – भाजपाला सत्तेबाहेर घालवण्यासाठी व देश वाचवण्यासाठी मतदान करा, असे आवाहन नवज्योत सिंग सिध्दू यांनी इंदूरच्या जनतेला केले. कॉंग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. हा मौलाना आझाद आणि महात्मा गांधी यांचा पक्ष आहे. त्यांनी गोऱ्यांपासून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. इंदूरवासीयांनो तुम्ही भाजपापासून देशाला मुक्ती मिळवून देणार आहात असे सिध्दू म्हणाले.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल निवडणूक आयोगाने नवज्योतसिंग सिद्धू यांच्या विरोधात नोटीस बजावली आहे. मध्य प्रदेशातील प्रचारसभेमध्ये बोलताना सिद्धू यांनी राफेल डीलवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींनी उद्योगपती अनिल अंबांनी यांना फायदा मिळवून दिला तसेच ते शहिदांचे राजकारण करत असल्याचा आरोप सिद्धू यांनी केला. मोदींनी देशाचा विश्वासघात केल्याचा आरोपही त्यांनी केला.