कंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीर येथील पुलवामातील दहशतवादी हल्ल्याबदल केलेल्या विधानामुळे वादात सापडलेले काँग्रेस नेते नवजोत सिंग सिध्दू यांनी आज पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. सिध्दू यांनी भाजपावर पलटवार केला आहे. पुलवामात दहशतवादी हल्ला घडवणाऱ्या मसूद अजहरची 20 वर्षांपूर्वी कोणी सुटका केली होती, असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

साल 1999 मध्ये कंदहार विमान अपहरण प्रकरण घडलं होतं. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी अजहरची सुटका केली होती. 20 वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेचा संदर्भ देत सिध्दू यांनी भाजपावर टीका केली.

पुढे बोलताना सिध्दू म्हणाले की, ‘या हल्ल्यामागे काही जण आहेत. त्यांच्या कृत्यांची शिक्षा सामान्य माणसाला, निष्पाप महिलांना, लहानग्यांना मिळू नये, असं मला वाटतं. मी माझ्या दृष्टीकोनावर ठाम आहे. दहशतवाद सहन करणार नाही. जे लोक दहशतवादास जबाबदार आहेत, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)