कामगारांच्या सुटकेसाठी मेघालयात नौदलाचे पथक

नवी दिल्ली: मेघालयातील खाणीत अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाच्या पथकाला पाठवण्यात आले आहे. विशाखापट्टणम येथून हे नौदलाचे पथक विशेष विमानाने मेघालयात नेले जात आहे. 13 डिसेंबरपासून हे कामगार तेथील खाणीत अडकले असून त्या खाणीत आता पाणी झाल्याने त्यांना तेथून बाहेर काढणे जिकिरीचे बनले आहे त्यासाठी हे पथक तिकडे पाठवले गेले आहे. येत्या 12 तासांत हे पथक प्रत्यक्ष घटनास्थळी मदत कार्यालयाला प्रारंभ करेल अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

लुमथारी गावातील कसन भागात ही खाण असून ती बेकायदेशीर असल्याचे सांगितले जाते. राज्य सरकारकडे पुरेशी यंत्रणा नसल्याने या अडकलेल्या कामगारांचे जीव धोक्‍यात आले आहेत. आता नौदल मदतीला आल्याने हे कामगार वाचण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)