निसर्गोपचार पद्धतीमागील तत्त्व 

शर्वरी कोल्हटकर 

निसर्गातील घटकांद्वारे आजार बरा करण्याच्या पद्धतीला निसर्गोपचार किंवा निसर्गोपचार पद्धती म्हणतात. निसर्गाशी सुसंवादी व निसर्गानुकूल, औषधविरहित उपचार पद्धती अशीही निसर्गोपचाराची व्याख्या करतात. निसर्गोपचार पद्धती ही एक पर्यायी उपचार पद्धती आहे. प्रत्येक व्यक्तीला झालेल्या किंवा होणाऱ्या आजारावरील उपचार शरीरांतर्गत असून, त्या व्यक्तीच्या शरीरात निसर्गत: आजार वा रोग बरा करण्याची क्षमता तसेच रोगप्रतिकारकशक्ती असते. त्यामुळेच झालेला आजार वा रोग निसर्गत: बरा करणे आणि आरोग्य कायम राखणे त्या व्यक्तीला शक्‍य असते, असे या उपचार पद्धतीमागील तत्त्व आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निसर्गोपचार ही एक पारंपरिक उपचार पद्धती असून ती शरीराला कमीत कमी त्रास देऊन अवलंबिली जाते. या पद्धतीत कमीत कमी शल्यक्रिया आणि औषधांचा उपयोग केला जातो. ताण नियंत्रण, आरोग्यदायी आहाराचे योग्य नियमन, मानसिक संतुलन आणि पंचमहाभूतांचा योग्य’ वापर यांचा अवलंब करतात. यामुळे रोग होणे मुळातच टाळता येईल आणि रोग झालाच तर अंतर्गत चैतन्य’ तो पूर्ण बरा करेल, अशी या उपचार पद्धतीची धारणा असते. आजार पूर्णपणे बरा  नाही झाला तर माती, पाणी, सूर्यप्रकाश व शुद्ध हवा यांच्या मदतीने उपचार करून रोगाची तीव्रता कमी करता येते.

निसर्गोपचार पद्धतीत सहा मूलतत्त्वे 
निसर्गोपचाराचे उपाय करणाऱ्यांनी ही तत्त्वे पाळावयाची असतात.
रुग्णाला कोणतीही इजा होणार नाही याची खबरदारी घेऊन त्याच्यावर उपचार केले जावेत.
व्यक्तीच्या शरीरातील अंगभूत प्रतिकारक्षमता ओळखून त्याच्या अंगी असलेल्या आजार बरा करणाऱ्या शक्तीचा आदर करावा आणि स्वत:हून आजार बरा करण्याचे चैतन्य त्याच्यात निर्माण करावे. आजारामागील कारणे ओळखावीत आणि त्यांचे निराकरण करावे. दिसणारी लक्षणे दाबू नयेत किंवा दुर्लक्षित करू नयेत. स्वत:चे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला शिक्षित करावे. त्याला निरोगी राहण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. तसेच स्वत:च्या शारीरिक क्षमतेबद्दलची जबाबदारी स्वत:ची आहे हे पटवून द्यावे. उपचार करताना प्रत्येक व्यक्तीच्या सवयी, आहार व अनारोग्य यांचा विचार करून उपचार करावा. प्रत्येक व्यक्तीने आपल्या अवतीभवतीचे लोक आणि समाज यांना आरोग्याचे महत्त्व सांगावे. तसेच आजार कसा टाळावा व स्वास्थ्य कसे राखावे, हेही सांगावे. नॅचरोपॅथीद्वारे पुर्ण शरीराची काळजी घेऊ शकते. पारंपारिक आजार दुर करण्याची क्षमता नॅचरोपॅथी मध्ये आहे. माणसाचा नैसर्गिक आजार बरा करण्याच्या प्रवृत्तीवर भर दिला जात असे. लक्षणांपेक्षा प्रत्यक्ष आजाराचा शोध घेतला जात असे. फक्त थेरेपीचा वापर घेत असे त्यात कुठल्याही प्रकारची इजा होत नसे. नॅचरोपॅथीचे डॉक्‍टर रोग्याचे जीवन पध्दतीकडे जास्त लक्ष देत असतात. नॅचरोपॅथी मध्ये फिजीकल, फिजीकोलॉजीकल, तसेच स्पिरिच्यूअल घटक आजार मध्ये लक्षात घेतले जात असत. नॅचरोपॅथीमध्ये रोग्यावर उपचार करताना अनेक अल्टरनेटिव्ह थेरेपीचा वापर करतात उदा. होमिओपॅथी, हर्बल रेमिडीज, पारंपारीक चायनीज औषध उपचार, स्पायनल मॅनिप्यूकेशन, न्युट्रिशन, हायड्रोथेरेपी, मसाज आणि व्यायाम. नॅचरोपॅथी चे डॉक्‍टर अधिकृत नॅचरापॉथी मेडिकल स्कुल मध्ये शिक्षण घेतलेले असतात. पहिले 2 वर्ष सामान्य वैद्यकिय शास्त्राचे शिक्षण दिले जाते त्यानंतर शेवटच्या 2 वर्षात नॅचरल हिलींग टेक्‍निकवर शिक्षण दिले जाते.

निसर्गोपचार ही आरोग्याची अशी एक नैसर्गिक उपचार पध्द्‌ती आहे जी शरीराची आणि मनाच्या स्वास्थ्य आणि रोगासंबंधी काळजी घेते. लोकांना त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांसाठी, रोगांसाठी आणि उपचारांसाठी ज्या पध्दती उपलब्ध आहेत, त्या सगळ्यांमध्ये एक निसर्गोपचाराची पध्दत उत्तम आहे. यात जीवन जगण्याच्या सगळ्या तत्वांचे एकीकरण झाले आहे आणि हीच एक पध्दत अशी आहे की जी मानवाला त्याच्या आजच्या वाढत्या रोगराई पासून आणि त्यापासून निर्माण होणारया धोक्‍यातून बाहेर काढू शकते. जीवनातील प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी जीवन जगण्यासाठी आवश्‍यक अशा सगळ्या तत्वांचा या पध्दतीत वापर केला जातो. तुम्ही तुमचे आरोग्य विकत घेऊ शकत नाही, ते तुम्हाला योग आणि नैसर्गिक आरोग्याच्या मदतीने उभे करावे लागते येथे आरोग्याची बांधणी करावी लागते विकत नाही घेता येत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)