“जॉब दो’च्या घोषणांनी दणाणला परिसर
नगर: देशातील बेरोजगारांची कैफियत मांडण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हा परिषदेसमोरील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरूवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यावर तिथे जोरदार घोषणाबाजी झाली. जिल्हा प्रशासनाला निवेदन देत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने बेरोजगारांची कैफियत मांडली. सरकारने फसविले असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला.
राष्ट्रवादीचे नगर शहर पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, ज्येष्ठ नेते दादा कळमकर, आमदार अरुण जगताप, क्षितिज घुले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, संदीप वर्पे, संजय कोळगे, माणिक विधाते, संपत बारस्कर, सुनील त्रिंबके, प्रकाश भागानगरे, किसनराव लोटके, वैभव ढाकणे, साहेबान जहागीरदार, अरविंद शिंदे, ऍड. शारदा लगड, रेखा जरे पाटील, रेश्मा आठरे, मंजुषा गुंड, शारदा लगड, गजानन भांडवलकर, गहिनीनाथ दरेकर, फारुख रंगरेज, दीपक सूळ, सोमनाथ धूत आदी आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलकांची भाषणे झाली. यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा