रायबरेली आणि अमेठीत काँग्रेसच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेसचा निवडणूक प्रचार करणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच  बेगुसराय येथून काँग्रेसच्या तिकिटावर उभे असणारे कन्हैया कुमार यांना देखील आमचा पाठिंबा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हंटले आहे.

रायबरेली आणि अमेठी हा अनुक्रमे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस, रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेसचा निवडणूक प्रचार करणार असल्याची माहिती आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी यांनी दिली आहे. तसेच बेगुसराय लोकसभा मतदारसंघामध्ये कन्हैया कुमारला आमचा पाठिंबा असेल, असे त्रिपाठी यांनी सांगितले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)