देशातील नक्षलवाद 3 वर्षात संपवला जाईल 

file photo
राजनाथ सिंह यांचा विश्‍वास 
लखनौ: देशातील कट्टर डाव्या विचारांची समस्या येत्या 3 वर्षात संपवली जाईल, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. लखनौमध्ये शीघ्रकृती दलाच्या 26 व्या स्थापनादिनानिमित्ताने आयोजित समारंभात ते बोलत होते. नक्षलवाद्यांविरोधातील कारवाई त्वरेने आणि वेगाने व्हायला हवी. मात्र ही कारवाई कधीही बेपर्वा असायला नको, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
देशातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या पूर्वी 126 इतकी होती. ती आता 10-12 इतकी कमी झाली आहे. आता 1-2 ते 2 वर्षाच्या कालावधीतच डाव्या कट्टरवाद्यांचा पूर्ण नायनाट केला जाईल. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या धाडसी, कष्टासाध्य आणि निष्ठेने केलेल्या कामगिरीनेच हे शक्‍य होईल, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
या वर्षभरात 131 माओवादी आणि दहशतवादी मारले गेले आहेत. तर 1.278 जण पकडले गेले आहेत. याच्या परिणामामुळे 58 नक्षलवाद्यांनी याच कालावधीत आत्मसमर्पणही केले आहे. जम्मू काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी सीआरपीएफ तैनात असल्याने काश्‍मीर आजही भारताचा अविभाज्य भाग राहिला आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
जम्मू काश्‍मीरमधील काही युवकांना दिशाभूल करून दहशतवादाकडे वळवले गेले होते. मात्र सुरक्षा दलांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. दंगल, निदर्शने आणि अंतर्गत अशांततेच्या काळात सीआरपीएफने केलेल्या कार्याचेही राजनाथ सिंह यांनी कौतुक केले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)