कर्नाटकात टीपू सुलतान जयंतीवरुन राजकारण पेटले

बंगळुरू  – म्हैसूरचे शासक टीपू सुलतान यांच्या जयंतीवरून कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय वातावरण पेटण्यास सुरूवात झाली आहे. एकीकडे कर्नाटकातील सत्ताधारी कॉग्रेसकडून टीपू सुलतान यांची जयंती साजरी करण्याची तयारी सुरू आहे. तर, दुसरीकडे भाजपने याला तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, कोणीही विरोध केला तरी टीपू सुलतान यांची जयंती नियोजित दिवशी साजरी केली जाईल, असे कर्नाटक सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

टीपू सुलतान यांच्या जयंतीला विरोध दर्शवित भाजप आणि श्री राम सेनेच्या समर्थक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे म्हणाले, टीपू सुलतान हे हिंदू विरोधी होते. मग त्यांची जयंती साजरी करण्याची गरज काय आहे. टीपू सुलतान यांचे शासक अत्याचारी होते असेही भाजपने म्हटले आहे.

दरम्यान, गतवर्षीही कॉंग्रेस सरकारने जयंती साजरी केली होती. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. शिवाय लोकांच्या हितासाठी राज्य सरकारने टीपू सुलतानची जयंती साजरी करु नये. फक्त मुस्लीम समुदायला खुश करण्यासाठी ही जयंती साजरी केली जात असल्याचा आरोप भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी केला आहे.

भाजपचा तीव्र विरोध पाहता गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन योग्य प्रकारे कायदा आणि सुव्यावस्था हाताळण्याचे आदेश दिले. तर कोणी या कार्यक्रमात बाधा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
2 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)