राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे वर्चस्व

पुणे – येथे पार -पडलेल्या विसाव्या राष्ट्रीय वरीष्ठ टेनिस व्हॉलिबॉल अजिंक्‍यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघास तिहेरी मुकुट मिळाला. तर, पुरूष गटात मुंबई तर महिला गटात पॉंडेचेरी संघास उपविजेतेपद मिळाले. सदर स्पर्धा टेनिस व्हॉलिबॉल फेडरेशन आँफ इंडिया व टेनिस व्हॉलिबॉल महाराष्ट्र असोसिएशन व श्री खंडेराव प्रतिष्ठान शैक्षणिक संस्था बालेवाडी यांच्या वतीने एस के पी कॅंम्पस बालेवाडी येथे पार पडल्या

यावेळी वरीष्ठ पुरूष गटात उपांत्य महाराष्ट्र संघाने पॉंडेचेरी संघास 2-1 अशा सेट्‌स मध्ये पराभूत करीत महाराष्ट्र संघाने अंतिम फेरी गाठली. अंतिम लढतीत महाराष्ट्र संघाने मुंबई संघास सरळ 2-0 अशा सरळ सेट्‌समध्ये पराभव केला. पॉंडेचेरी संघाने तिसरा क्रमांक पटकाविला. महिला गटात उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघाने आंध्र प्रदेश संघास 2-1 अशा सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली.

अंतिम फेरीत महाराष्ट्र संघाने पॉंडेचेरी संघाचा 2-1 अशा सेटमध्ये पराभव करत विजय मिळविला. पॉंडेचरी उपविजयी तर केरळ संघ तिसऱ्या स्थानावर राहीला. मिश्रदुहेरी विभागाच्या अंतिम फेरीत महाराष्ट्र संघाने पॉंडेचेरी संघाला 2-0 अशा सेटमध्ये हरविले. केरळ संघाने तिसरे स्थान घेतले. स्पर्धेस पंच प्रमुख प्रफुल्ल कुमार बनसोड, किरण खोलप, स्मृति रंजन, गणेश माळवे, ऍलेक्‍झांडर, दर्शन सिंग परमार, काजल यादव, प्रा.नागेश कान्हेकर, नेहा बनसोड यांनी पंच म्हणून काम पाहिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)