‘समलैंगिकता’ हा गुन्हा नाही : सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाचा एेतिहासिक निर्णय

नवी दिल्ली – समलैंगिकता हा गुन्हा की अधिकार, यावर आज सर्वोच्च न्यायालयाने एेतिहासिक निर्णय दिला आहे. ‘समलैंगिकता हा गुन्हा नाही’, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, ‘प्रत्येकाला आपल्या इच्छेने जगण्याचा अधिकार आहे. जुनी विचारधारा बदलण्याची गरज आहे. प्रत्येकाला स्वत:ची स्वतंत्र अशी अोळख आहे. समाजातील लोकांनी आपली विचारधारा, मानसिकता बदलायला हवी’. ‘समलिंगी संबंध हा गुन्हा नाही’, असा महत्वपूर्ण, एेतिहासिक असा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अल्पवयीन मुलं आणि प्राणी यांच्याशी अनैसर्गिक संभोगाबाबतच्या दंडात्मक तरतुदींमध्ये न्यायालयाने कोणतेही बदल केले नाहीत.

कलम 377 नुसार समलैंगिकता गुन्हा आहे, त्यामुळे हे कलम कायदेशीर की बेकायदेशीर, याविषयी महत्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालय देणार होतं. यापूर्वी 2 जुलै 2009 मध्ये दिल्ली हायकोर्टांने निकाल देत समलैंगिक संबंध कायदेशीर ठरवले होते. मात्र नंतर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा समलैंगिकता गुन्हाच आहे, असा निर्णय दिला होता. पण मागीलवर्षी सर्वोच्च न्यायालयाने स्वत: आपल्या निर्णयावर फेरविचार करायचं ठरवलं होतं आणि हा खटला पुन्हा सुरू झाला होता.

‘समलैंगिकता’ हा गुन्हा नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज देशभरात जल्लोष करण्यात येत आहे. एलजीबीटी  (lesbian,gay,bisexual,transgendr) या संपूर्ण कम्युनिटीसाठी हा महत्वाचा निर्णय आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत या कम्युनिटीकडून होत आहे, तसेच देशभरात जल्लोष देखील करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)