चांगवेन – भारताच्या आणखी एका युवा नेमबाजाने आयएसएसएफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. नेमबाजीत आज 16 वर्षीय युवा नेमबाज ह्रदय हजारिकाने 10 मीटर एअर पिस्तोल ज्युनियर स्पर्धेत शुक्रवारी सुवर्णपदक पटकाविले आहे.

ह्रदय हजारिकाने स्पर्धेत इराणच्या नेमबाजाला शूटआऊटमध्ये पराभूत करत प्रथम स्थान पटकाविले. इरानच्या आमिर मोहम्मदने रौप्यपदक तर रूसच्या ग्रिगोरी शामाकोव याने कांस्यपदक पटकाविले.

याआधी भारताचा युवा नेमबाज सौरभ चौधरीने याने काल ज्युनिअर गटातील 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारात सुवर्णपदक पटकाविले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)