पाकिस्तान लीग मध्ये खेळणार क्रिकेटचा ‘मिस्टर 360’

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक, सर्वोत्कृष्ट खेळाडू ‘एबी डिविलियर्स’ हा आगामी वर्षात पाकिस्तान लीगमध्ये खेळणार आहे. स्वत: एबी डिविलियर्स याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे.

डिविलियर्स याने शुक्रवारी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘आता वेळ पाकिस्तान सुपर लीगची आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2019 मध्ये पार्टी होईल’.

डिविलियर्स कोणत्या टीमकडून खेळणार आहे, हे अजूनपर्यंत स्पष्ट झाले नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी 34 वर्षीय डिविलियर्स याने 114 कसोटी, 228 एकदिवसीय आणि 78 टी-20 सामने खेळले आहेत.

पीएसएलने सुध्दा (पाकिस्तान सुपर लीग) ट्विट करत डिविलियर्स लीगमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. डिविलियर्स भारतात खूपच लोकप्रिय आहे. मागील वर्षी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघात महत्वपूर्ण कामगिरी त्याने निभावली होती. त्याने आयपीएलमध्ये 141 सामन्यात 3953 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतक आणि  28 अर्धशतक आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)