पुणे – भारतीय रोइंग फेडरेशनच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र रोइंग असोसिएशनच्या वतीने22व्या सब-ज्युनियर आणि चौथ्या आंतरराज्य चॅलेंजर्स स्प्रिंट राष्ट्रीय रोइंग स्पर्धेस आजपासून येथे प्रारंभ होत आहे. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंगच्या आर्मी रोइंग सेंटरमध्ये ही स्पर्धा 9 ते11जून दरम्यान होणार आहे.
सबज्युनियर गटातील स्पर्धा 15वर्षांखालील मुले आणि मुलींमध्ये होणार आहे. या स्पर्धेत 22राज्यांतून 600 हून अधिक रोव्हर्स सहभागी होणार आहेत. केंद्रशासित प्रदेशातील मुले आणि मुलीही या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक 50 खेळाडू सहभागी होत आहेत. ही स्पर्धा सिंगल स्कल्स, डबल स्कल्स, कॉक्सलेस पेअर -2, कॉक्सलेसपेअर -4 आदी प्रकारांत होणारआहे.आज सकाळी आठ वाजल्यापासून प्राथमिक फेरीस सुरुवात होईल. सोमवारी रिपेचेज आणि उपांत्य फेरीच्या शर्यतींना सुरुवात होईल.
11 जून रोजी स्पर्धेच्या अंतिम शर्यती आणि पारितोषिक वितरण समारंभ असेल. यावेळी पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव उपस्थित राहणार आहेत. भारतात सर्वांत कमी वय असलेल्या या वर्गाचीही श्रेणी आहे.या गटातून भारताला भविष्यात गुणवान खेळाडू मिळू शकतात. रोव्हर्सची दुसरी फळी तयारी व्हावी,हा या स्पर्धेमागील हेतू आहे. सहा लेनच्या कोर्सवरयाशर्यतीहोतील. पाचशे मीटर अंतराच्या शर्यती प्रेक्षणीय आणि चुरशीच्या होतील अशी अपेक्षा आहे.