सत्तेवर आल्यावर छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल : राहुल गांधी

file photo

राजनंदगाव (छत्तीसगड)  – विधानसभा निवडणूकीनंतर छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास 10 दिवसातच शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, असे आश्‍वासन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मुख्यमंत्री रमण सिंह यांचा बालेकिल्ला असलेल्या राजानंदगावमध्ये झालेल्या प्रचारसभेमध्ये दिले.

राहुल गांधी यांनी “वस्तू आणि सेवा कर’ लादल्याबद्दलही भाजप सरकारवर टीका केली. या कराचे वर्णन त्यांनी पुन्हा एकदा “गब्बर सिंह टॅक्‍स’ असे केले. छत्तीसगडमधील सत्तारुढ भाजपप्रमाणे आपण खोटी आश्‍वासने देणार नाही. कॉंग्रेसने पंजाब आणि कर्नाटकमधील निवडणूकीदरम्यान शेतीकर्ज माफ करण्याचे आश्‍वासन दिले होते. या दोन्ही राज्यांमध्ये सत्तेवर आल्यावर आपले वचन पाळण्यात आले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

छत्तीसगडमध्ये सत्तेवर आल्यास 10 दिवसात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, तसेच शेतकऱ्यांना बोनसही दिला जाईल, असे आश्‍वासनही दिले.
छत्तीसगडमध्ये 12 आणि 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होत आहे. तर मतमोजणी 11 डिसेंबर रोजी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)