लोकसभा 2019 : आम आदमी पक्षातर्फे पंजाबमध्ये 5 उमेदवाराच्या नावाची घोषणा

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने 2019 साली होणाऱ्या निवडणुकीसाठी पंजाबमध्ये पाच उमेदवाराच्या नावाची मंगळवारी घोषणा केली आहे. पक्षाचे कोअर समितीचे अध्यक्ष बुध राम यांनी माध्यमाशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.

बुध राम यांनी सांगितले की, ‘विद्यमान खासदार भगवंत मान आणि साधू सिंह हे स्वतच्या मतदारसंघातून म्हणजेच संगरूर आणि फरीदकोट येथून निवडणूक लढवतील. शाम चौरासी या जागेतून 2017 ची विधानसभा निवडणूक लढलेले रवजोत सिंह होशियारपूर येथील मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत’. ‘पक्षाचे माझा झोनचे प्रभारी कुलदीप सिंह धालीवाल अमृतसर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर 2017 मध्ये मोहालीतून पंजाब विधानसभा निवडणुक लढलेले नरिंदर सिंह शेरगिल यांना आनंदपूर साहिब येथून तिकिट देण्यात आले आहे’.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राम यांनी सांगितले की, ‘उर्वरित आठ जागांसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा नंतर केली जाईल’. दरम्यान आम आदमी पक्षाने 2014 लोकसभा निवडणुकती एकूण 13 जागेपैकी 4 जागा जिंकल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)