नोटाबंदीमागे देशहिताचाच विचार होता : पियुष गोयल

नवी दिल्ली  – रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी नोटाबंदीचा निर्णय देशहिताचाच होता त्यावर टीका करण्याची आवश्‍यकता नाही, असे म्हटले आहे. नोटाबंदीचा निर्णय आर्थिक पारदर्शकता आणण्यासाठीच घेतला होता. या निर्णयामुळे भ्रष्टाचाराशी दोन हात करणे सरकारला शक्‍य झाले. तसेच काळ्या पैशावरही अंकुश लावता आला. भारताला भ्रष्टाचाराच्या जोखडातून सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतला होता. हा निर्णय कठोर होता हे मान्य आहे मात्र, तो देशहितासाठीच घेण्यात आला होता असेही गोयल यांनी म्हटले आहे.

नोटाबंदीचा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ झटकण्यासाठी घेण्यात आला होता. काळा पैसा बाहेर यावा हा या कठोर निर्णयाचा मुख्य हेतू होता. ज्यांनी देशाबाहेर काळा पैसा जमा केला होता तो सरकारी तिजोरीत जमा करण्यास सांगितले होते. ज्यांनी तो केला नाही अशांवर आम्ही कारवाईही केली आहे, असे त्यांनी या विषयावर पत्रकाराशी बोलताना सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)