इंधनदरवाढीमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला
इतर प्रमुख शहरातील इंधनाचे दर
मुंबई : पेट्रोल (91.08), डिझेल (79.72)
पुणे : पेट्रोल (90.92), डिझेल (78.35)
चेन्नई : पेट्रोल (87.05), डिझेल (79.40)
कोलकत्ता : पेट्रोल (85.53), डिझेल (76.94)
दिल्ली : पेट्रोल (83.73), डिझेल (75.09)
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह इतर राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सोमवारी पुन्हा एकदा वाढ झाली असून इंधनदरवाढीचे सत्र कायम अाहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लीटरमागे 24 पैसे आणि डिझेलच्या दरामध्ये लीटरमागे 30 पैशांनी वाढ झाली आहे.
या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 83.73 रुपये तर डिझेलचे दर प्रतिलीटर 75.09 रुपये इतक्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. तर देशाची अार्थिक राजधानी मुंबईमध्ये प्रति लीटर पेट्रोलसाठी 91.08 रूपये तर प्रति लीटर डिझेलसाठी 79.72 रूपये मोजावे लागत आहे. तर पुणे शहरात आज प्रति लीटर पेट्रोलचा 90.92 रूपये तर डिझेलचा प्रति लीटर 78.35 रूपये असा दर आहे.
दिल्लीमध्ये 1 जानेवारी 2018 रोजी पेट्रोलचा दर 69.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 59.70 रुपये प्रति लिटर असा होता. जानेवारी 2018 महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते आजच्या तारखेपर्यंत पेट्रोलचे दर 13.76 रूपयांनी तर डिझेलचे दर 15.39 रूपयांनी महागले आहे.
विना अनुदानित सिलिंडर 59 रुपयांनी महागले
इंधन दरवाढीची छळ बसत असताना रविवारी अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 2 रुपये 89 पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे 499.51 पैशांना मिळणारा सिलिंडर आता 502.40 पैशांना खरेदी करावा लागणार आहे. तर विना अनुदानित सिलिंडर तब्बल 59 रुपयांनी महागले आहे. ही दरवाढ मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेल्या घरसरणीमुळे विना अनुदानित सिलिंडरच्या दरात ही वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली. तसेच अनुदानित सिलिंडरच्या दरातील वाढ ही जीएसटीमुळे करण्यात आली आहे, असे अधिका-यांनी सांगितले. विना अनुदानित सिलिंडरची किंमत 879 रुपयांवर पोहचली आहे. त्यामुळे आता बॅक खात्यांमध्ये 376.60 रुपये प्रति सिलिंडर सबसिडी जमा होणार आहे. यापूर्वी 320.49 पैसे सबसिडी मिळत होती.
इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका
या इंधनदरवाढीमुळे इतर जीवानश्यक वस्तूंचे दरसुध्दा वाढत असून सामान्य नागरिकांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा