भारत चीनला साखर निर्यात करणार

नवी दिल्ली  – भारत चीनला तब्बल पंधरा लाख टन कच्ची साखर जानेवारी महिन्यात निर्यात करणार आहे. त्यामुळे देशात निर्माण झालेला सारखेचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटण्याची शक्‍यता आहे. भारत-चीन देशांदरम्यानची व्यापारी तूट भरून काढण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा एक भाग असून बासमतीनंतर चीनने भारताची साखर खरेदी केली आहे.

वाणिज्य विभागाचे प्रतिनिधी मंडळ पाच ते आठ नोव्हेंबर दरम्यान चीनमध्ये होते. त्या शिष्टमंडळाशी चीन सरकारशी सारख खरेदीबाबत करार केला आहे. चीनच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशभरातील ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कच्च्या साखरेच्या निर्यातीमुळे पांढऱ्या साखरेचे उत्पादन कमी हावून बाजारात साखरेचे दर स्थिर राहतील. त्यामुळे ऊस उत्पादकांना एफआरपी किंवा त्याहून अधिक पैसे मिळू शकतात. साखर उद्योगाकडून आजच्या कराराचे जोरदार स्वागत केले आहे.

साखरेचे दर स्थिर राहावेत यासाठी केंद्र सरकारला एकूण पन्नास लाख टन साखर निर्यात करायची आहे. त्यापैकी वीस लाख टन साखर चीन खरेदी करतोय. वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत भारतीय शुगर मिल्स असोसिएशन आणि चीन सरकार दरम्यान याबाबत करार करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)