भ्रष्टाचार रोखण्यासाठी उच्च मुल्याच्या नोटांचे वितरण थांबवा : ओमप्रकाश राजभर

लखनौ -नोटाबंदीच्या निर्णयाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याच्या उपयोगाबाबत पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, उत्तरप्रदेशातील एक मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी उच्च मुल्याच्या नोटांचे वितरण थांबवण्याची मागणी केली आहे.

देशातील भ्रष्टाचार थोपवायचा असेल तर 500 आणि 2 हजार रूपये मुल्याच्या नोटा चलनातून बाद करायला हव्यात. मोदी सरकारने केवळ 1 ते 100 रूपये मुल्याच्या नोटांनाच परवानगी द्यावी. भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा तो एकमेव मार्ग आहे, अशी भूमिका मांडणारे ट्विट राजभर यांनी केले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नोटाबंदीवरून मोदी सरकारला लक्ष्य केले होते.

सर्व पैसा भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडे परत आला. मग, नोटाबंदीचा उपयोग काय झाला, असा सवाल त्यांनी केला होता. राजभर यांच्या नेतृत्वाखालील सुहेलदेव भारतीय समाज पक्ष उत्तरप्रदेशातील भाजपचा मित्रपक्ष आहे. त्या राज्यातील सरकारमध्ये सहभागी असूनही राजभर सातत्याने भाजपच्या विरोधात भूमिका घेतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)