सोशल मीडियातील घटनाक्रमाकडे लक्ष

नवी दिल्ली – 2019 च्या वर्षात देशातील सर्वात महत्त्वाच्या निवडणुका येत आहेत. यामुळे सोशल मीडियातून गैरप्रकार होण्याची शक्‍यता आहे. या काळात सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी अधिक दक्ष राहण्याची गरज माहिती तंत्रज्ञान खात्याने व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वीच माहिती तंत्रज्ञान खात्यातील ज्येष्ठ अधिकारी आणि फेसबुक, गुगल, ट्‌विटर, व्हॉट्‌सऍपसारख्या महत्त्वाच्या सोशल मीडिया कंपन्यांची एक मीटिंग पार पडली. यात माहिती तंत्रज्ञान कायदा आणि त्यातील गरजेच्या सुधारणा यावर महत्त्वाची चर्चा करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक, गुगल, ट्‌विटरसारखी सोशल सेवा देणाऱ्या वेबसाइट्‌स आणि व्हॉट्‌सऍपसारखे मेसेंजर यांना आता अशी काही खास व्यवस्था करावी लागणार आहे की, ज्याद्वारे बेकायदा गोष्टींची, जसे की, अफवा पसरवणाऱया पोस्ट, मॉर्फ केलेले फोटो, द्वेषभावना भडकवणारे लेखन इत्यादींची लगेच ओळख पटू शकेल. त्यांच्यावर तातडीने कारवाई करणे शक्‍य होईल. अशा प्रकारे सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी आर्टिफिशल इंटेलिजन्ससारख्या प्रभावशाली तंत्रज्ञानाची मदत घेण्याची सूचनादेखील या कंपन्यांना करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच सरकारने काही केंद्रीय एजन्सीजना युजर्सच्या कॉम्प्युटर्सवर आणि सोशल मीडियाच्या वापरावर लक्ष ठेवण्याचे अधिकार प्रदानदेखील केले आहेत. मात्र सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षांनी चांगलीच आगपाखड केली आणि हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचा आरोपदेखील केला आहे. दरम्यान आगामी निवडणूकीसाठी सोशल मिडियाचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी बहुतांश राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)