लोकसभेत गाजले ‘सीबीआय विरूध्द ममता’ प्रकरण ; ‘सीबीआय तोता है’च्या विरोधकांनी दिल्या घोषणा

नवी दिल्ली – कोलकत्याचे पोलीस प्रमुख राजीव कुमार हे चिट फंड घोटाळ्यांवरून चक्क सीबीआयच्या रडारवर आले आहेत. मात्र, त्यांच्या मागे सीबीआयचा ससेमिरा लागल्यावरून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतप्त झाल्या आहेत. कुमार  यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत ममता बॅनर्जी ‘संविधान बचाव’ची घोषणा करीत काल रात्रीपासूनच धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. ममतांच्या या भुमिकेला विरोधकांनीही पाठींबा दिला आहे.

हे प्रकरण लोकसभेत आज चांगलेच गाजले आहे. टीएमसीच्या खासदारासह विरोधकांनी हे प्रकरण उचलून घेतले आहे. लोकसभेत टीएमसीच्या खासदारांनी सीबीआय तोता है आणि चौकीदार चोर है अशा जोरदार घोषणा दिल्या.

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या या प्रकरणाला समाजवादी पक्षाने समर्थन दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पश्चिम बंगाल मध्ये सीबीआय व्दारे केलेल्या कारवाईची आम्ही निंदा करतो. त्यानंतर गोंधळाच्या वातावरणात केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी या वादावर आपले वक्तव्य दिले.

राजनाथ यांनी म्हटले की, देशात पहिल्यांदा सीबीआयला काम करण्यापासून रोखण्यात आले आहे. एखाद्या राज्यात सीबीआयचे काम रोखणे  हे पहिल्यांदाच घडते आहे.  त्यांनी म्हटले की , सीबीआयने शारदा चिटफंड प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई केली. पुलिस कमिशन यांना अनेक वेळा याप्रकरणी नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र अनेकदा नोटीस पाठवून सुध्दा ते हजर झाले नाहीत, त्यानंतर त्याच्यांवर कारवाई करण्यात आली. पुढे सांगितले की, या प्रकरणी माहिती मिळताच मी पश्चिम बंगालच्या राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी, चीफ सेक्रेटरी आणि डीजीपी यांना तातडीने परिस्थिती हाताळून योग्य कारवाई  करण्याचे सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)