ग्रोधा हत्याकांडावर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणीत

नवी दिल्ली – गुजरातमध्ये 2002मध्ये झालेल्या गोध्रा कांड आणि दंगलीप्रकरणी सोमवार, दि. 19 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार आहे. याप्रकरणी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतरांना एसआयटीने दिलेली क्‍लिन चिट गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. या निर्णयाला झकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

या प्रकरणी मंगळवारी न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. दिपक गुप्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी पुढील सुनावणी 19 नोव्हेंबरला सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. दरम्यान, 5 ऑक्‍टोबर 2017 मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने गुजरात दंगलीची पुन्हा चौकशी होणार नसल्याचे म्हटले होते.

या दंगलीवेळी माजी दिवंगत खासदार अहसान जाफरी यांची हत्या करण्यात आली होती. यामागे मोठा कट असल्याचे झकिया जाफरी यांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले होते. परंतु, उच्च न्यायालयाने हे मानण्यास नकार देत सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास सुचवले होते.

दरम्यान, याचिकेत वर्ष 2002 मध्ये ग्रोधा कांडानंतर झालेल्या दंगलीप्रकरणी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतरांची विशेष तपास पथकाने दिलेली क्‍लिन चिट सत्र न्यायालयाने कायम ठेवली होती. त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. माजी दिवंगत खासदार अहसान जाफरी यांच्या पत्नी झकिया आणि सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांची स्वयंसेवी संस्था सिटीजन फॉर जस्टिस अँड पीसने दंगलीमागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप करत नरेंद्र मोदींच्या क्‍लिन चिट याचिकेवर पुनर्विचार याचिका दाखल केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)