मध्य प्रदेशात वाजतगाजत होणार वंदेमातरम्‌

टीका झाल्यानंतर कमलनाथ यांच्या निर्णयात बदल

अमित शहा यांनी केली होती टीका

कॉंग्रेसने मध्य प्रदेशला तुष्टीकरणाचे केंद्र केल्याचा आरोप भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला होता. राष्ट्रीय गीतावर बंदी घालण्याचा कमलनाथ सरकारचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणा असल्याचे शहा यांनी फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले होते. वंदेमातरम्‌ केवळ एक गीत नसून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक आणि प्रत्येक भारतीयाचे प्रेरणास्त्रोत आहे. वंदेमातरम्‌ बंदी घालून कॉंग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्या वीरांचा अपमान केला आहे. याचबरोबर कॉंग्रेसचा हा निर्णय मध्य प्रदेशच्या जनतेसोबत विश्वासघात करणारा आहे. कोणत्याही प्रकारच्या राजकीय विचारसरणीत देशाच्या हुतात्म्यांचा अपमान करणे माझ्या दृष्टीने देशद्रोहच असल्याचे शहा म्हणाले होते.

भोपाळ – मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर महिन्याच्या पहिल्या ताखेला होणारे वंदे मातरम्‌ बंद झाल्याने मोठा वाद झाला होता. वंदे मातरम्‌च्या मुद्द्यावर विरोधकांसह सोशल मीडियावरही कॉंग्रेसचे वाभाडे निघाले होते. त्यामुळे जाग आलेल्या कमलनाथ सरकारने यावर आपला निर्णय बदलला असून यू टर्न घेतला असून वाजतगाजत “वंदे मातरम्‌’चे गायन होईल, असे जाहीर केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मध्य प्रदेशमध्ये मंत्रालयात गेल्या 13 वर्षापासून महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांनी वंदेमातरम्‌ म्हणण्याची प्रथा रूढ झाली होती. परंतु राज्यात कॉंग्रेसचे सरकार आल्यानंतर वंदेमातरम्‌ झाले नाही, त्यामुळे कमलनाथ सरकारवर विरोधक तुटून पडले होते.

परंतु आता सरकारने वंदेमातरम्‌ला अधिक आकर्षक करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला सकाळी अकरा वाजता पोलीस बॅंडच्या धूनवर वंदेमातरम्‌ होईल असा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत आता वंदेमातरम्‌च्या गायनासाठी सामान्य नागरिकांनाही सहभागी होता येणार आहे. यामुळे आता या प्रकरणावर पडदा पडणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)