देशातील असहिष्णूता वाढली : प्रणब मुखर्जी 

नवी दिल्ली: संपूर्ण भारत देश सध्या कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करत असून देशातील असहिष्णूता वाढली आहे, असे प्रतिपादन देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केले. भारताने जगाला “वसुधैव कुटुंबकम्‌’ची संकल्पना दिली. पण आज देशातच मानवाधिकारांचे हनन होत आहे. या वाढत्या असहिष्णूतामुळे जास्तीत जास्त पैसा श्रीमंतांच्याच खिशात जात असल्याने गरीब-श्रीमंतांतील वाढलेली दरी चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली येथे आयोजीत दोन दिवसीय संमेलनात ते बोलत होते. मुखर्जी म्हणाले, देश सध्या एका अवघड परिस्थितीतून जात आहे. ज्या भूमीने वसुधैव कुटुंबकम आणि सहिष्णूतेचे धडे जगाला दिले आहेत. तीच भूमी आता असहिष्णुतेत वाढ, मानवाधिकारांचे उल्लंघन आणि दंगलींमुळे चर्चेत आहे. सध्या सरकारी संस्थांवरचा जनतेचा विश्वास उडाला आहे. या संस्थांच्या कामकाजाबाबत संशयाचे वातावरण आहे.

जेव्हा एखादे राष्ट्र बंधुभाव आणि सहिष्णुतेचे स्वागत करते तेव्हा ते विविध समाजाच्या सदभावनेला प्रोत्साहित करते. आपण परस्परांबद्दलच्या द्वेषाला दूर करतो आणि आपल्या रोजच्या जीवनातील ईर्ष्या आणि आक्रमकता दूर करतो तेव्हा तिथे शांती आणि बंधुभाव निर्माण होतो. सर्वाधिक चांगले वातावरण अशा देशांमध्ये असते. जो देश आपल्या नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा पुरवतो. त्यांना सुरक्षा आणि स्वायत्तता प्रदान करतो, असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)