चंद्राबाबूं नायडूच्या पक्षाला गळती

विशाखापट्टणम – आगामी काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार असतानाच तेदेप अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्यासमोर अडचण उभी राहिली आहे. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू यांना एका मागोमाग एक झटके बसत आहेत. त्यांच्या पक्षाचे नेते राजीनामे देत असल्याने लोकसभा निवडणुकीसाठी नायडू यांची व्यूहनीती अपयशी ठरू शकते.

पांडुला रवींद्र बाबू यांनी तेदेपमधून राजीनामा दिला आहे. रवींद्र बाबू हे अमलापूरमचे खासदार राहिले असून राज्यातील मुख्य विरोधी पक्ष वायएसआर कॉंग्रेसमध्ये सामील झाले आहेत. रवींद्र बाबू यांनी वायएसआर कॉंग्रेस अध्यक्ष वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांची भेट घेत अधिकृतपणे त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

याचबरोबर 7 दिवसांच्या कालावधीत तेदेपचा राजीनामा देणारे रवींद्र बाबू हे दुसरे खासदार ठरले आहेत. रवींद्र बाबू यांच्यापूर्वी तेदेप खासदार एम. श्रीनिवास यांनीदेखील वायएसआर कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर तेदेप आमदार अमांची कृष्ण मोहन यांनीदेखील पक्ष 2सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)