अधिक अपत्यांचा नायडू यांचा सल्ला!

विजयवाडा – आंध्र प्रदेशात दोनहून अधिक अपत्यांना जन्म देणाऱ्या दांपत्याला सवलती दिल्या जाणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी ही घोषणा केली आहे. दोनहून अधिक अपत्यांना जन्म देणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविण्यास मज्जाव करणारा नियमदेखील नायडू यांनी संपुष्टात आणला आहे.

मुख्यमंत्र्यांची ही घोषणा कुटुंब नियोजन नियमांच्या विरोधात आहे. राज्याच्या लोकसंख्येतील वृद्धी मागील 10 वर्षांमध्ये 1.6 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. खायची तोंडे जितकी अधिक असतील, तितकेच हात कमाविण्यासाठी उपलब्ध असतील असे नायडू यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागील 25 वर्षांमध्ये राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 50 टक्के तरुणाईची लोकसंख्या वाढली आहे. जितकी अधिक मुले असतील तितकेच राज्य अधिक तरुण ठरेल असे नायडू यांनी सांगितले. नायडू यांच्या सरकारने स्वतःच्या या योजनेला योग्य ठरविण्यासाठी राज्याच्या सातत्याने घसरणाऱ्या जन्मदराचा दाखला दिला आहे.

राज्याचा जन्मदर 2014 मध्ये 1000 मागे 37 टक्के होता, जो कमी होत 2018 मध्ये 10.51 टक्‍क्‍यांवर आल्याचे नायडू म्हणाले. 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या आधारावर आंध्र प्रदेशचा देशात 10 वा क्रमांक होता. तेलंगणाची निर्मिती होण्यापूर्वी आंध्रची एकूण लोकसंख्या 8.46 कोटी होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)