मत खरेदीसाठी दोन हजाराची नोट

काळा पैसा कमी करण्याच्या नावाने झाला राजकीय कट

विशाखापट्टनम – देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने गाजावाजा करत नोटाबंदी जाहीर केली. मात्र, नोटाबंदी हा राजकीय कट असल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. या राजकीय कटामुळे मोदी यांनी मतदारांचे मत विकत घेण्याचे काम अधिक सोपे केले आहे, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारला फटकारले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खिशात दोन हजाराचे एक बंडल घेऊन फिरले आणि मतदाराला एक नोट दिली तरी आता सहज मत विकत घेता येते. या उद्देशानेच त्यांनी दोन हजार रुपयांची नोट आणली असा आरोपही त्यांनी केला. यासाठीच आपण नोटाबंदीला विरोध केला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण पाच वर्षे जनतेची सेवा केली आहे. जनहिताची अनेक कामे आपल्या सरकारने केली आहेत त्यामुळे मते विकत घेण्याची वेळ आपल्यावर येणार नाही, असेही ते म्हणाले. विशाखापट्टनममध्ये एका कार्यक्रमात नायडू बोलत होते.

नोटाबंदी हा राजकीय कट असल्यानेच आपण त्याला विरोध केला होता. या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेकांच्या रोजगारावरही कुऱ्हाड कोसळली आहे. याबाबत आपण केंद्र सरकारला एक अहवालही दिला होता. नोटाबंदीमुळे शेतकरी, बेरोजगार युवक, सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे.

नोटांबदीच्या निर्णयाचा गैरफायदा घेत भाजपने उत्तर प्रदेशात मते विकत घेतली. त्यावेळी भाजप सोडून इतर पक्षांकडे पैसाच नव्हता. त्यामुळे त्यांनी सढळ हाताने पैसे वाटत मत खेरदी केल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील जनतेने आणि आपण नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास ठेवला होता. मात्र, त्यांनी धोका दिल्याचे नायडू यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विचारले असता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि कृषीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशा परिस्थितीत सरकार बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)