भाजपने देश आर्थिक डबघाई व विनाशाच्या मार्गावर नेला : पी. चिदंबरम

गुवाहाटी – भारतीय जनता पक्षाने जुने विषय उकरून काढून देशात मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण चालवले असून त्यांनी देश आर्थिकदृष्ट्या डबघाईला आणला आहे तसेच त्यांनी देशाला विनाशाच्या मार्गावर नेले आहे असा आरोप ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केला आहे.

भाजपची केंद्रातील राजवट आता संपत आली आहे आणि याच वेळेला त्यांना पुन्हा हिंदुत्व आठवले आहे. स्वता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 ला लालकिल्ल्यावरून केलेल्या भाषणात देशवासियांना सर्व वादग्रस्त विषय किमान 10 वर्ष मागे ठेवण्याचे आवाहन केले होते. आज त्यांना त्यांच्यात आवाहनाचा विसर पडला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यापर्यंत, मंत्र्यांपर्यंत सर्वच जण हिंदुत्वाची आग्रह धरताना जुने वादग्रस्त आणि विघातक विषय पुन्हा उपस्थित करताना दिसत आहेत. आम्ही भाजपला ते केवळ विरोधी पक्ष आहेत म्हणून विरोध करीत नाही तर त्यांची देशाविषयीची जी भावना आहे त्याला आमचा विरोध आहे. त्यांची धोरणे भेदभाव करणारी, विशिष्ट घटकांना मुख्य प्रवाहापासून दूर लोटणारी आणि लोकांच्या भावना दाबून टाकणारी आहेत.

भाजपच्या या धोरणांविषयी लोकांमध्ये जागृती करणे हे कॉंग्रेसचे कर्तव्य आहे. जी आश्‍वासने कधीच पुर्ण होऊ शकत नाहीत अशी आश्‍वासने देऊन ते सत्तेवर आले आहेत. त्यांची अनेक आश्‍वासने ही केवळ निवडणूक जुमला होती. ती हवेतच विरून गेली आहेत.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, अन्न आणि इंधनाच्या किंमती कमी करणे, डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत चाळीस रूपयांवर आणणे, करविषयक दहशतवाद कमी करणे अशा घोषणा देऊन ते सत्तेवर आले पण त्यातील एकही आश्‍वासन त्यांना पुर्ण करता आलेले नाही असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीसाठी लोकांशी बोलून निवडणूक जाहीरनामा तयार करण्याचे काम कॉंग्रेसने हाती घेतले आहे त्यासाठी लोकांशी खुली चर्चा करण्यासाठी आपण येथे आलो आहोत असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)