आंध्र प्रदेशात नवे उच्च न्यायालय

नवी दिल्ली – आंध्र प्रदेशच्या नवीन उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून सी. प्रवीण कुमार यांनी शपथ घेतली आहे. कुमार यांनी राज्यपाल ईसीएल नरसिंहन यांच्या उपस्थित शपथ घेतली आहे. विजयवाडा येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

राज्यपालांनी यावेळी 16 न्यायाधीशांनाही पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राजधानी अमरावती येथे या नवीन न्यायालयाचे कामकाज चालणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या न्यायालयाच्या निर्मितीमुळे देशात आता उच्च न्यायालयांच्या संख्येत वाढ होऊन 25 झाली असून नवीन सुरू झालेल्या या न्यायालयाचे आंध्र प्रदेश उच्च न्यायालय असे नाव देण्यात आले आहे. कायदा मंत्रालयाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीने 26 डिसेंबर 2018 रोजी अधिसूचना जारी केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)