मोदी यांनी खोटी आश्‍वासने दिली : अहमद पटेल

 सरकार लोकांच्या मनातून उतरले

अहमदाबाद  – 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी नरेंद्र मोदींनी जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यात ते अयशस्वी राहिले आहेत, असे कॉंगेसचे नेते अहमद पटेल यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खोटी वचने, खोटी माहिती पसरवून तुम्ही सत्तेत आलात. पण चार वर्षांतच आपण लोकांच्या मनातून एवढे उतरू, असा विचारदेखील तुम्ही केला नसेल. लोकांचा आता भाजपच्या मोहजालातून बाहेर आले आहेत. त्यामुळेच तीन राज्यांमध्ये कॉंग्रेसला मोठा विजय मिळाला आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.

गुजरातमधील साबरकांठा येथे सभेला संबोधित करताना अहमद पटेल यांनी मोदींवर हल्ला चढवला. 2014 च्या लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर आता आपल्याला कुणीच पराभूत करू शकणार नाही, असे तुम्हाला वाटले. पण तो तुमचा अहंकार होता. तुमच्या हे लक्षात आलं नाही की ज्या जनतेने तुम्हाला सत्तेत आणले तेच तुम्हाला हाकलून पण देतील, अेसेही पटेल म्हणाले. तसेच यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या धोरणांवरही टीका केली.

मोदी केवळ नेहरू जॅकेट घालून जवाहरलाल नेहरू बनू शकत नाहीत. परदेशात दौरे करून इंदिरा गांधींसारखे बनू शकत नाही. डिझायनर जॅकेट आणि कुर्ते घातल्याने राजीव गांधी बनू शकत नाही, असा टोला कॉंग्रेसचे पटेल यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे. तसेच या नेत्यांच्या रांगेत विराजमान होण्यासाठी तुम्ही त्यांच्यासारखा त्याग केला पाहिजे. असा त्याग करण्याचे धाडस तुमच्यात आहे का?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी तिहेरी तलाकचे विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ देणार नाही, असे ठाम मत मांडले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)